• संस्थेने अनुउत्पादक मालमत्तेचे प्रमाण ० % वर टिकवून ठेवून वर्षानुवर्षं ऑडीट वर्ग 'अ' मिळविला आहे.
• 'मागताक्षणी पैसे परत' ह्या तत्वावर आधारित कार्यपद्धतीमुळे पैसे सुरक्षितरीत्या गुंतविला जातो.
• सहकार क्षेत्रामधील कायद्यांचे तंतोतंत पालन.
• ग्रामीण भागात जिथे बँकिंग व्यवस्था पूर्णपणे कार्यान्वित नाही अशा ठिकाणीसुद्धा संस्था कार्यरत आहे.
• उद्योगांना संस्थेचा सर्वतोपरी पाठींबा आहे. ज्यामुळे उद्योग वाढीस लागून त्या संस्थेची उन्नती आणि प्रगती साधली जाते. संस्थेसाठी हि अभिमानाची गोष्ट आहे जेव्हा होतकरू वडापाववाल्याचा उद्योग वाढीस लागून तो एक मोठया रेस्टॉरंटचा मालक बनतो.
• ८०च्या दशकातील सुरवातीच्या काळात बँकिंग सेवा समाजातील तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहचावी या करिता ज्ञानदीप पतसंस्थेने अल्पपतपुरवठा योजना राबवण्यासाठी 'बँकसेवा तुमच्या दारी' ह्या अनोख्या तत्वावर रोजच्या रोज सक्षम दैनंदिन ठेव प्रतिनिधीं मार्फत बँकिंग सेवा अतिशय सोप्यापद्धतीने पुरविली. ह्या सेवेचा लाभ प्रामुख्याने छोटे भाजीवाले व दुकानदार ह्यांना झाला. ह्यामुळे त्यांच्या दैनंदिन ठेवीचे रुपांतर बचतीमध्ये झाले.
• संस्थेचा सामुहिक विकासावर कायमच दृढ विश्वास आहे . अन्य सहकारी पतसंस्थांना मदत करून त्यांचा विकास करणे व आर्थिक अडचणीत असलेल्या संस्थाना मदत करणे हे संस्थेचे सामाजिक कार्य होय. एखादेवेळेस कोणती पतसंस्था जर का मदत देऊनसुद्धा वरती येऊ शकत नसेल तर संस्था ठेवीदारांच्या पैश्यांच्या सुरक्षिततेसाठी त्या संस्थेला आपल्यात विलीन करून घेते. आतापर्यंत संस्थेने ४ पतसंस्थांना आपल्यात विलीन करून घेतले आहे.