आज ज्ञानदीप संस्थेची ओळख ही एक अग्रगण्य सहकारी पतसंथा अशी आहे. आर्थिक भूमिका निभावाण्यासोबातच संस्था सामाजिक कार्यातून नैतिक भूमिकासुद्धा निभावते.
संस्थेचे काही ठळक उपक्रम-
1. ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम रेसिडेन्शिअल स्कूल. -
संस्थेच्या दृष्टीने शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. आजच्या घडीला वाई व जवळील परिसरातील एकंदर ९०० विद्यार्थ्यांना निवासी शाळेमुळे उच्चस्तरीय इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण प्रणालीचा फायदा होत आहे.
अधिक माहितीकरिता http://www.demsschool.in/ वेबसाईटवर भेट देणे.
2. गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना-
२०१३ पासून गरीब व गरजू कुटुंबातील हुशार मुलांना संस्थेने दत्तक घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुलभूत अधिकाराचा फायदा प्राप्त करून देण्यास मदत केली आहे.
3. जलयुक्त शिवार अभियान -
महाराष्ट्र राज्यास २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाच्या एकात्मिक पाणी संवर्धन आणि व्यवस्थापन योजनेस संस्थेकडून भरीव अर्थसहाय्य.
4. सभासद कल्याण निधी -
संस्थेच्या सभासदांना आर्थिक किंवा आपत्कालीन संकटांदरम्यान मदत मिळावी ह्या हेतूने संस्था निव्वळ नफ्यातून भरीव रकमेचे योगदान सभासद कल्याण निधीला करत असते.
5. रक्तदान शिबीर -
वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याने दर वर्षी सप्टेंबर महिन्यात रक्तदान शिबीर आयोजित केले जाते.
6. आषाढीवारी मध्ये वैद्यकीय मदत -
महाराष्ट्राच्या प्रसिद्ध आषाढीवारीमध्ये वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याने वैद्यकीय मदत पुरविली जाते. संस्थेचे संचालक स्वतः वारीमध्ये सामील होऊन वारकर्यांसोबत चालण्याचा आनंद अनुभवतात.
7. सभासदांची तीर्थयात्रा -
दरवर्षी जानेवारी महिन्यात संस्थेच्या सभासदांसाठी पवित्र तीर्थधाम काशी येथे तीर्थयात्रा आयोजित केली जाते.
8. हळदी कुंकू समारंभ -
संस्थेच्या महिला सभासदांकरिता हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला जातो. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे स्त्री शक्ती संघटीत होण्यास मदत मिळते व त्यामुळे त्या पुढाकार घेऊन विविध सामाजिक उपक्रमात भाग घेण्यास त्या प्रवृत्त होतात. सर्व सामजिक स्तरातील एकूण १५,००० महिला ह्या उपक्रमात सहभागी झाल्या.
9. संत तुकारामांच्या गाथा मंदिरासाठी योगदान -
'संत तुकारामांच्या गाथा', हा एक जागतीक किर्तीचा सामाजिक उपक्रम आहे. संगमरवरावर कोरून त्याचे मंदिर बनावे याकरिता १० वर्षांपासून सभासद आपल्या लाभांशातील रकमेमधून भरघोस निधी जमा करून ह्यासाठी योगदान करत आहेत. त्यातूनच ज्ञानदीप भक्त निवासाची निर्मिती झाली.
10. ज्ञानदीप वधुवर सूचक केंद्र -
मुंबईत गेली ३० वर्ष सामाजिक बांधीलकी म्हणून नावाजलेल्या ज्ञानदीप वधुवर सूचक केंद्रातून आजपर्यंत १०,००० वर लग्ने जमवली आहेत. केंद्राच्या पुणे व सातारा येथेही शाखा आहेत. वधुवरसूचक मंडळाची वेबसाईट सुद्धा आहे- www.dnyandeepvadhuvar.com (भ्रमणध्वनी क्रमांक - ९७६६५११४४४ / ९७६६५८८४४४)
11. खडवली वृद्धाश्रम -
संस्थेकडून खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमास मदत केली जाते. संस्थेचे संस्थापक श्री. विश्वनाथ गोविंदराव पवार विश्वस्त म्हणून कार्य करतात.
12. जीवन संध्या मांगल्यम -
खेड्यातील जेष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्रात जेष्ठ नागरिक संघटना उभारण्यात आल्या आहेत ज्या जेष्ठ नागरिकांना विविध उपक्रमांमार्फत साहाय्य करीत असतात.
जीवनातील संध्याकाळ आनंदमय जावी हीच या पाठीमागची भावना आहे.
नजीकच्या काळातील हाती घेण्यात येणारे उपक्रम:
1. पर्यावरणाची काळजी.
2. जेष्ठ नागरिक संघटना उभारणी.